Saturday 23 February 2013

दुसरे महायुध्द- second world war


दुसरे महायुध्द हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युध्द मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे (Allied forces) व अक्ष राष्ट्रे (Axis powers) यांच्या मध्ये झाले. दोस्त राष्ट्रांमध्ये फ्रांस, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युध्दामध्ये सहा कोटीच्यावर जिवीत हानी झाली. मनुष्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जिवीत हानी आहे. या युध्दामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. कारणे- जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण व जपानचे चीन, अमेरिका व ब्रिटीश आणि डच वसाहतींवरचे आक्रमण ही दुसर्‍या महायुद्धाची कारणे समजली जातात. जगाच्या दोन्ही बाजूच्या या घटनांचे कारण होते जर्मनी व जपानमधील हुकुमशाही सत्ताधीश व त्यांची जगज्जेते होण्याची महत्त्वाकांक्षा. जरी या दोन्ही सत्तांनी आपले पाय पसरवण्यास आधीच सुरुवात केली असली तरी दुसर्‍या महायुद्धाची अधिकृत सुरुवात झाली ती या झोंडशाहीला झालेल्या सशस्त्र विरोधाने. जर्मनीत नाझी पक्ष जरी लोकशाही मार्गाने सत्तेवर आला असला तरी एकदा हातात सत्ता आल्यावर पक्षाधिकार्‍यांनी जर्मनीतील लोकशाही व्यवस्थेची लक्तरे काढली. असे असून जर्मन जनतेने त्यांना पाठिंबा दिला कारण पहिल्या महायुद्धात पराभूत झाल्यावर त्यांना जर्मन स्वाभिमानाला जागे करणारे सरकार प्रथमतःच मिळालेले होते. पहिल्या महायुद्धात शरणागती पत्करताना व्हर्सायच्या तहातील २३१वे कलम जर्मन जनतेला असह्य झाले होते. या शिवाय साम्यवाद-विरोध आणि आर्थिक सुबत्ता व प्रगतीच्या वचनांना भुलुन जर्मनीने नाझी पक्षाला व पर्यायाने एडॉल्फ हिटलरला अमर्याद सत्ता बहाल केली. हिटलरने जर्मनीला आपल्या हक्काच्या समजल्या जाणार्‍या सगळ्या देशांना जर्मन सत्तेखाली आणण्याचे वचन दिले व त्यादृष्टीने पावलेही उचलली. सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. त्याला खीळ घालण्यासाठी जपानने डिसेंबर ७, १९४१रोजी अमेरिकेच्या पर्लहार्बर येथील नौसेना तळावर जबरदस्त हल्लाकेला व तेथील आरमार उद्ध्वस्त केले. अमेरिकेलाआता युद्धात उतरणे भागच होते.अशा प्रकारे अमेरिकेचा या युद्धातप्रवेश झाला. युद्धाची सुरुवात - इ.स. १९३९- १९३९च्या सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की व्हर्सायच्या तहात गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की पोलंड व चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत. युद्धाचे परिणाम- अमेरिकेचा परमाणुप्रयोग व सोवियेत संघाचे मांचुरियावरील आक्रमण पाहून जपानी सम्राट हिरोहितोने प्रधानमंडळाला न विचारता युद्धसमाप्तीचे प्रयत्न सुरू केले. ऑगस्ट १७ला केलेल्या दूरवाणीवरील आपल्या भाषणात त्याने आपल्या सैनिकांना हत्यारे खाली ठेवण्याचा आदेश दिला तसे करताना त्याने कारण सोवियेत आक्रमणाचे दिले व परमाणुबॉम्बचा उल्लेख टाळला. ऑगस्ट १४, इ.स. १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करली व हे अतिभयानक युद्ध अधिकृतरीत्या समाप्त झाले. -हताहत, नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार -गुप्त कारस्थाने व भूमिगत सशस्त्र चळवळी दुसर्‍या महायुद्धाने मानवी इतिहासात कधिही न पाहिलेली अतोनात हिंसा पाहिली. जगातील सर्वच राष्ट्रे यात भरडली गेली. काहि युद्धग्रस्त होतेच तर काहिंना त्याचे परिणाम भोगावे लागले. जर्मनी, पोलंड व रशिया व जापान मध्ये सर्वाधिक लोक बळी पडले. वर नमूद केल्याप्रमाणे मृतांची संख्या सहा कोटीवर असण्याची शक्यता आहे. ब्रिटन फ्रान्स, जर्मनी व रशिया या देशांतील शहरेच्या शहरे हवाई हल्यांमध्ये संपुर्णपणे बेचिराख झाले. पुढील अनेक दशके या देशांना ते पुन्हा उभारण्यात घालवावी लागली.

No comments:

Post a Comment