Saturday 23 March 2013




अभिनव बिंद्रा , abhinav bindra
अभिनव बिंद्रा, सॅम पित्रोदा 'पद्मभूषण'चे मानकरी
ऑलिंपिकमध्ये भारताला पहिलंवहिलं सुवर्णपदक मिळवून देण्याचा पराक्रम करणा-या नेमबाज अभिनव बिंद्राला ‘ पद्मभूषण ’ हा बहुमानाचा किताब देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसंच ज्येष्ठ शास्त्रज्ञ सॅम पित्रोदा यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज पद्म पुरस्कारांच्या यादीवर स्वाक्षरी केली. त्यापैकी पद्मभूषण पुरस्कारांच्या यादीत अभिनव बिंद्राचं नाव ‘ सुवर्णाक्षरा ’ त झळकलं आहे. ऑलिंपिकच्या आजवरच्या इतिहासात सुवर्णपदावर भारताचं नाव कोरण्याची किमया कुणीच खेळाडू करू शकला नव्हता. परंतु, यंदा नेमबाज अभिनव बिंद्रानं अचूक लक्ष्य साधलं आणि भारताचा झेंडाही ऑलिंपिकमध्ये फडकला. या अभिमानास्पद कामगिरीसाठी बिंद्राला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मभूषण पुरस्काराचे ३० मानकरीः
खेळः अभिनव बिंद्रा

अभिनव बिंद्राला १०मी एअर रायफलमधले सुवर्णपदक मिळाले. आधुनिक ऑलिंपिकची सुरुवात झाल्यापासून भारताला मिळालेले हे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक. ही आम्हा भारतीयांसाठी जेवढी अभिमानाची गोष्ट आहे किंबहुना तेवढीच लाजिरवाणीही. ऑलिंपिक खेळांना सुरुवात झाली की भारताला ऑलिंपिकमध्ये आणि ऑलिंपिक स्तरावरच्या खेळांत पदके का मिळत नाहीत, हा प्रश्न पुन्हा एकदा सतावू लागतो. आणि आम्ही पुन्हा एकदा कारणे शोधू लागतो.

भारत अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलियासारखे "स्पोर्टिंग नेशन" (खेळांत रूची घेणारा देश) नाही. आम्ही खेळ खेळण्यापेक्षा बघण्यात वेळ घालवतो. (फुटबॉलचा विश्वकप, विंबल्डन वगैरे वगैरे). कारण १) आम्हाला खेळ प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा बघणे ( आणि बघत-बघत "फेडररचा बँकहँड केवळ अद्भुत", "झिदानचे बॉलस्किल्ज लाजवाब. त्याने काय थ्रू पास दिला" अशा टिपण्या करणे) आवडते किंवा २) भारतात मूलभूत सुविधांची (खेळांची मैदाने, स्टेडियम वगैरे, कोचिंग वगैरे वगैरे) दयनीय कमतरता आहे.
शालेय शिक्षणांत आणि शैक्षणिक धोरणांत खेळांना महत्त्वाचे स्थान नाही.
भारताचे राष्ट्रीय क्रीडा धोरण चुकीचे आणि कुठलीही दूरदृष्टी नसणारे आहे. खेळांच्या संघटनांत राजकारणच जास्त आहे. खेळांच्या विकासासाठी पुरेसे बजेट नाही.
भारतीयांना अशा स्पर्धांत भरीव कामगिरी करण्यापेक्षा स्पर्धापरीक्षांत (आयएएस ते लोअर डिविजन क्लर्क) यश मिळवून बाबूगिरी करणे किंवा अधिक आवडते आणि पालक पाल्यांना प्रोत्साहन देत नाहीत.
ज्या समाजाच्या मूलभूत गरजा (रोटी,कपडा आणि मकान) पूर्ण होऊ शकत नाहीत, खायचे वांधे आहेत, त्या समाजाकडून ऑलिंपिकमध्ये पदकांची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
भारतीयांची शरीरयष्टी, आहार असा आहे की आम्हाला पदके मिळू शकत नाहीत. आम्ही खूप चांगली कामगिरी करू शकत नाही.
नेहमीप्रमाणे इतर खेळांच्या वाईट अवस्थेला क्रिकेटच कारणीभूत आहे.
सलाम अभिनव बिंद्राला!!!
सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच
बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर
कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे
बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले
इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक
सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते.
श्वास अगदी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत टि.व्ही.चा आवाज वाढवून भारताचे नाव आणि ऐकण्यासाठी
प्राण कानात गोळा करून ऐकत होतो. चीनच्या गतविजेत्या आणि यावेळेच्या रजतपदक विजेत्या झू
किनान च्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. क्षण आला अभिनव बिंद्राच्या पदक प्रदानाचा! पण पठ्ठ्या
अगदी शांत आणि संयमी निघाला. ज्या अविचलतेने त्याने शेवटचा शॉट घेतला त्याच शांतपणे त्याने
पदकाचा स्वीकार केला. आता वेळ होती भारताच्या राष्ट्रगीताची! ’जन गण मन’ ची धून वाजवणे सुरू
झाले आणि आपला तिरंगा चीन आणि फ़िनलंडच्या राष्ट्रध्वजाच्याही काही ईंच वर हळूहळू सरकू
लागला. मन अगदी भरून आले. एक गौरवाचा क्षण मी अनुभवत होतो!
आता सगळे मिडियावाले चेकाळतिल. अभिनव बिंद्राने काल काय खाल्ले होते,कोणत्या देवाचे नाव घेतले
होते ईथपासून त्याने कोणत्या रंगाची अंडरवियर घातली होती ईथपर्यंत चर्चा झडतिल. स्वतःचे काही
कर्तुत्व नसलेले राजकारणी त्याचे श्रेय आपल्याला कसे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न
करतिल.आपल्याला त्याचे काही देणेघेणे नाही! जो संयम आणि चिकाटी दाखवत अभिनव ने सुवर्णपदक
मिळवले आहे त्याबद्दल एक अभिमान मनात राहील. आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा
वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते. आता मिडियाचे चेकाळणे सहजतेने सहन करतांना
तोच एक क्षण सतत डोळ्यांसमोर येत राहील. सलाम अभिनव बिंद्राला!

सुवर्णपऑलिम्पिकइतकेच महत्त्वाचे - अभिनव बिंद्रादक
जिंग ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचेवेळी जेवढे दडपण माझ्यावर होते, तेवढेच दडपण आज येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील अंतिम टप्प्यात माझ्यावर होते कारण येथे आपल्या घरच्या शूटिंग रेंजवर कौशल्य दाखवित असतो, असे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता व येथे गगन नारंगच्या साथीत दहा मीटर एअर रायफलच्या पेअर्समध्ये सुवर्णपदक मिळविणारा अभिनव बिंद्रा याने ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
बिंद्रा याने ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. आज त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. आजच्या कामगिरीविषयी विचारले असता बिंद्रा म्हणाला, ऑलिम्पिक सुवर्णपदक सर्वार्थाने श्रेष्ठ आहे मात्र त्या वेळी जेवढे दडपण होते, तेवढीच चिंता आजही वाटत होती. दिल्ली हे होमपिच असल्यामुळे तेथे सर्वोत्तम कामगिरी करणे अनिवार्य आहे. माझ्या चाहत्यांचीही माझ्याकडून तीच अपेक्षा होती. येथे सर्वोत्तम कामगिरी करणे सोपे नव्हते. कारण येथेही तुल्यबळ लढत होती. राष्ट्रकुल स्पर्धेचे संयोजन माझा देश करीत आहे आणि तेही माझ्या शहरात. साहजिकच सुवर्णपदक मिळविण्याची नैतिक जबाबदारी माझ्यावर होती.

नेमबाजी हा भारताचा अग्रगण्य खेळ : नारंग
भारतीय खेळाडूंनी गेल्या दोन तीन वर्षांमध्ये नेमबाजीत सातत्याने चमकदार यश मिळवित या खेळास आपल्या देशातील अग्रगण्य क्रीडा प्रकार म्हणून नावारुपास आणले आहे असे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध घेणाऱ्या गगन नारंग याने सांगितले.
गगन म्हणाला, सध्या नेमबाजीची लोकप्रियता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी मिळविलेली पदके व त्यांची कामगिरी लक्षात घेता हाच खेळ सध्या आपल्या देशात नंबर वन आहे. अन्य खेळातील खेळाडूंना चाहत्यांसमारे किंवा प्रसारमाध्यमांसमोर आपला आनंद व्यक्त करता येतो. आमच्या खेळात आम्हाला तसा आनंद व्यक्त करता येत नाही.
नेमबाजी हा काही सोपा क्रीडा प्रकार नाही. सर्वोच्च यश मिळविण्यासाठी खूपच मेहनत करावी लागते. सतत एकाग्रता व मानसिक संतुलन ठेवावे लागते. त्यातच ही स्पर्धा भारतात होत असल्यामुळे आमच्याकडून चाहत्यांना खूपच अपेक्षा असते, असेही गगन याने सांगितले.