Tuesday 26 February 2013



अभयारण्य - abhayaranya - forest
मेळघाट अभयारण्य
महाराष्ट्राच्या प्रमुख अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्य़ाघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. इथे पट्टेवाले आणि बिबळे वाघ, रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत.
मेळघाट
मेळघाट मध्य भारताच्या द्शीण सातुपुडा पर्वत रागांमध्ये वसलेले आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रंग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्ध सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू , खापर , सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्याच्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदिला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जगलात माखला , चिखलदरा , चीलादारी , पातुल्डा आणि गुगमाळ ही अनीशाय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सध्यास्थितीत प्रकाल्पा अंतर्गत 676.93 वर्ग किलोमीटर भूमी राखीव आहे.



काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाट व नागांव जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थानात केलेला असून, जगात सापडणार्‍या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतियांश गेंडे या अभयारण्यात सापडतात.[१] काझीरंगा मध्ये अनेक वाघ असून २००६ मध्ये याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या जंगलात अनेक हत्ती, पाणम्हशी तसेच हरणे आढळतात. काझीरंगा अभयारण्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात. काझीरंगा हे भारतातील सर्वात जास्त सुरक्षित अभयारण्य मानले जाते.
काझीरंगा मध्ये चार प्रमुख नद्या आहेत. यापैकी मुख्य म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी होय. तसेच अनेक छोटे-मोठे पाण्याचे तलाव सुद्धा आढळतात. काझीरंगाला १९०५ मध्ये संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला होता.
वनस्पती
काझीरंगा उद्यानात मुख्यत: चार प्रकारचे वनस्पती विभाग आढळतात.[१९] पाण्याने भरलेला गवताळ प्रदेश, सवाना जंगले, विषववृत्तीय पानगळीची जंगले व वृत्तीय अर्ध सदाहरित जंगले. लँडसॅट उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार १९८६ साली या जंगलाचा ४१% भाग हा उंच गवताने, ११% भाग हा छोट्या गवताने, २९% भाग उघड्या जंगलाने, ४% भाग दलदलीने, ८% भाग नद्या व अन्य पाण्याने, व उरलेला ६% भाग हा वाळूने व्यापलेला होता.
प्राणीजगत
काझीरंगा उद्यानात ३५ विविध प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात.[२१] यापैकी सुमारे १५ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.[९] ह्या उद्यानात जगात असणार्‍या एकशिंगी गेंड्यांच्या एकूण संख्येपैकी सर्वात जास्त संख्या (१,८५५),[२२][९] तसेच पाणम्हशी (१,६६६)[२३] व बाराशिंगा (४६८) आढळते.[२४] तसेच शाकाहारी प्राण्यापैकी हत्ती (१,९४०),[२५] रानगवे (३०) आणि सांबर (५८) सुद्धा आढळतात. छोट्या प्राण्यांमध्ये भेकर, रानडुक्कर व हॉग हरणे सुद्धा आढळतात.



नागझिरा अभयारण्य

संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही आहे. फारपूर्वी या जंगलात हत्तींचे वास्तव्य जास्त असावे व त्यावरूनच नागझिरा असे नाव या अभयारण्यास पडले असावे. तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य १५२.८१ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे यात विद्युत पुरवठा अजिबात नाही, हे जंगल नैसर्गिकच राखले गेलेले आहे.
यात सुमारे २०० च्या जवळपास पक्षांची नोंद करण्यात आली आहे. या तश्या छोट्या अश्या अभयारण्यात वाघासमवेतच बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, उदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्प गरुड, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटिक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल इत्यादी अनेक प्राणी व पक्षांची नोंद निसर्गप्रेमींनी घेतली आहे.[१]
या सोबतच नजीक असलेली स्थळे कोसमतोंडी,चोरखमारा,अंधारबन,नागदेव पहाडी इत्यादी प्रेक्षणीय आहेत.[२]

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या भंडारा शहरापासून सुमारे ४० कि. मी. अंतारावरील साकोली गावापासून अंदाजे २२ कि. मी. अंतरावर एकीकडे नागझिरा अभयारण्य असून दुसरीकडे सुमारे ३० कि. मी. अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे.


दाचीगाम राष्ट्रीय उद्यान
दाचीगाम राष्ट्रीय उद्यान हे भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या ह्या राष्ट्रीय उद्यानाचे वैशिष्ट्य आहे येथे आढळणारे हंगूल हरीण. हे एक प्रकारचे सारंग हरीण असून, केवळ येथेच आढळते. हे उद्यान श्रीनगर पासून २२ किमी अंतरावर असून हिमालयाच्या मध्यम ते अतिउंच रागांमध्ये आहे. दाचीगाम या नावाचा कश्मीरीमध्ये अर्थ आहे दहा गावे. हे नाव येथून हलवलेल्या दहा गावांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे. हे उद्यान १९१० पासून अस्तित्वात आहे. सुरुवातील केवळ काश्मीरचे महाराजा यांच्या अखत्यारीत होता. १९८१ मध्ये याचे राष्ट्रीय उद्यानात रुपांतर करण्यात आले.
जंगल प्रकार
येथील जंगल हे मुख्यत्वे सूचीपर्णी वृक्षांचे आहे. तसेच ओक व चिनार चे वृक्षही मोठ्या प्रमाणावर आढळतात. उद्यानातील वृक्षरेषा ही खूपच ठळक आहे. जंगलात ठिकठिकाणी मोकळी कुरणे आहेत.
प्राणी जीवन
वर नमूद केल्याप्रमाणे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे हंगूल अथवा काश्मीरी हरीण, हे हरीणांच्या सारंग कुळातील आहे. केवळ येथेच आढळत असल्याने तसेच जम्मू आणि काश्मीर मधील राजकीय अस्थिरता यामुळे याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या या हरीणांची वर्गवारी अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून करण्यात आलेली आहे.[२].
या उद्यानातील इतर प्रमुख प्राणी म्हणजे कस्तुरी मृग, बिबट्या, हिमालयीन वानर, हिमालयीन अस्वल, हिमालयीन तपकीरी अस्वल, कोल्हा, खोकड, रानमांजर, पाणमांजर व हिमालयीन मॉरमॉट आहेत.
येथे पक्षीजीवनही विपूल आहे व खास हिमालयीन जाती येथे आढळतात. हिमालयीन ग्रिफन गिधाड हे त्यापैकी एक.


नान्नज अभयारण्य
नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ ८४९६ चौ.कि.मी इतके आहे.यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केले आहे.[१] कुठल्याही एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची दुर्मिळ घटना आहे.
जंगलाचा प्रकार
महाराष्ट्रातील या अभयारण्याचा भाग हा पुर्णतः पर्जन्यछायेत येतो व महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा भागांमध्ये गणला जातो. त्यामुळे येथे झाडांनी व्यापलेला प्रदेश अतिशय नगण्य आहे. येथील जंगल हे मुख्यत्वे गवताळ आहे व काटेरी वनस्पतींनी व्यापलेला आहे. या मुख्यत्वे बाभूळ, घायपात, आपटा, नीम,शीसव, मापटी, तारवाड, अमोणी, कांचारी यासारख्या वनस्पतींचा समावेश होतो. मराठी साहित्यात या जंगलाचा गवताळ वाखर असा उल्लेख केला आहे[२].
प्राणिजीवन
वर नमूद केल्याप्रमाणे माळढोक येथील मुख्य वन्यजीव आहे. अत्यंत चिंताजनक प्रजातीतील माळढोकाची संख्या एवढा मोठा भूभाग संरक्षित करुनही अजूनही चिंताजनकच आहे. येथे काळवीट मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. तसेच भारतीय लांडगा येथे आढळून येतो. भारतीय लांडग्याचे वरील नमूद केलेला जंगलप्रकार मुख्य वसतीस्थान आहे. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये खोकड,मूंगूस व तरस येथे आढळून येतात.



अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य
अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य
अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य
अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य अभयारण्य

4 comments:

  1. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

    ReplyDelete